केंद्राच्या पोषण शक्‍ती योजनेअंतर्गत वाटलेल्‍या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या

राजुरा तालुक्यातील मार्डा जि.प. शाळेतील घटना
Live larvae in chocolate distributed under Centre's Nutrition Shakti Scheme
केंद्राच्या पोषण शक्‍ती योजनेअंतर्गत वाटलेल्‍या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्याFile Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

राजुरा तालुक्यातील मार्डा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयात केंद्राच्या पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आणि सोंडे आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हाच प्रकार आर्वी गावातही घडला आहे. या प्रकारामुळे चिमुकल्यांच्या पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवीताशी खेळणा-या या पुरवठाधारकावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी गावक-यांनी केली आहे. दरम्यान राजुरा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांनी यासंदर्भात अहवाल शिक्षण विभागाकडे सादर केल्याची माहिती मिळाली असून, राजुरा, कोरपना व जीवती तालुक्यात या चॉकलेटचे वितरण बंद करण्यात आले आहे.

राजुरा तालुक्यातील मार्डा या गावात इयत्ता 1 ते 7 पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. 28 ऑगस्ट रोजी चॉकलेटचे वाटप करण्यात आले होते. इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यांनी हे चॉकलेट फोडून पाहिले असता, त्यात जिवंत अळ्या व सोंडे आढळले. विद्यार्थ्यांनी ही माहिती शिक्षकांना दिली. यासंदर्भात मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी राजुरा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी मनोज गौरकर यांना माहिती दिली.

त्यांनी तातडीने याची दखल घेत मार्डा आणि आर्वी येथील चॉकलेट सिल करून तपासणीसाठी पाठविले असून यासंदर्भात अहवाल चंद्रपूर जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी यांना पाठविला आहे. या घटनेनंतर तातडीने राजुरा तालुक्यातील चॉकलेट वाटप बंद करण्यात आले आहे.

शासकिय निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना व जीवती या तिन तालुक्यातच चॉकलेट वाटप करण्यात येत आहे. मात्र या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आणि सोंडे आढळल्याने या तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वितरण थांबविण्यात आले असून चॉकलेट परत मागविले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्‍याशी असा खेळ करणा-या प्रकरणाची चौकशी करून संबधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. या घटनेनंतर पोषण आहार आहे की, विद्यार्थ्यांना आजारी करण्याचा आहार, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news