

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : खाऊ घेऊन देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. दरम्यान, आज (दि.१५) दोन्ही आरोपींना वरोरा येथील सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाचे दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. उद्या बुधवारी पुन्हा अरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी नसिर वजीर शेख ( वय ४८) रसिद रूस्तम शेख (वय ५८) अटकेत असलेल्या आरोपींचे नाव आहे. (Chandrapur Crime News)
चिमुर शहरातील 13 व 10 वर्षाच्या दोघी मैत्रिणींवर खाऊ देण्याचे आमिष दाखवून त्याच वार्डातील आरोपी आरोपी नसिर वजीर शेख (वय 48) रसिद रूस्तम शेख (वय 58) यांनी वारंवार अत्याचार केला. काल सोमवारी ही अत्याचाराची घटना उघडकीस आली. पिडीत मुलीनेच स्वत:चे आईला काल सोमवारी रात्री अत्याचार झाल्याबाबत माहिती दिली. त्यांनतर कालच रात्री पीडीतेच्या आईने चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. दरम्यान माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे चिमूर शहरात प्रचंड आक्रोश निर्माण झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करीत आरोपींवर कठोर कारवाई मागणी करण्यात आली. रात्री अकरा ते 3 वाजेपर्यंत संतप्त जमावाने चिमुर पोलिस ठाण्याला चार तास घेराव घातला आणि फाशीची मागणी केली. संतप्त झालेल्या जमावामुळे दोन्ही आरोपी नसिर वजीर शेख ( वय 48) व रसिद रूस्तम शेख (वय 58) ठाण्यात स्वत: शरण आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पोक्सो कायद्यान्वये अटक करण्यात आली होती.
दरम्यान, काल रात्री पोलिस ठाण्याला घेराव घालून दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक महिला शिपायासह दोघेज जखमी झाले. तर जमावावर केलेल्या लाठीमारामध्ये दोन नागरिक जखमी झाले. त्यांना उपचाराकरीता नागपुरात भरती केले आहे. सध्या चिमूर शहरातील तणावपूर्ण वातावरण शांत झाले आहे. अजूनही शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम करीत आहेत.