भंडारा: मुसळधार पावसासह अचानक वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मोहाडी तालुक्यातील सातोना येथे रविवारी (दि.१) घडली. योगेश गजानन हटवार (३६) रा. रोहना खुर्द असे मृताचे नाव आहे. योगेश हा सातोना येथील शेतशिवारात काम करीत होता. दरम्यान दुपारी अचानक वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला.