अमरावती : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मुलीवर निर्जन स्थळी नेवून अत्याचार

संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक
Girl assaulted on the pretext of giving a lift
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मुलीवर अत्याचारfile photo
Published on
Updated on

दुचाकीवरून गावी सोडून देण्याची बतावणी करून निर्जन स्थळी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना अमरावतीमधील कुऱ्हा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली. संशयित आरोपी हा गावातील सरपंचाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. महेश रमेश गोरे (वय.२५) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

Girl assaulted on the pretext of giving a lift
वाशिम : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अमरावती शहरात शिक्षण घेते. शनिवारी (दि.२४) अमरावतीवरून गावी जात असताना शहरातील एका चौकात उभी होती. तिला गावातील एका तरुणाने दुचाकीवर सोडून देण्याची बतावणी केली. संशयित आरोपी महेश हा परिचयातील असल्यामुळे ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. या नंतर आरोपीने तिला दुचाकीवर बसून नेताना एका शेतात निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने मदतीसाठी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. नागरिकांच्या हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.

Girl assaulted on the pretext of giving a lift
जळगाव : महिलांवरील अत्याचार अक्षम्य पाप - पंतप्रधान नरेंद्र मोदी

या घटनेची तक्रार पिडित मुलीने कुऱ्हा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी महेश रमेश गोरे (वय २५) याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला असून त्याला अटक केली आहे. आरोपी हा सरपंचाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news