अकोला : पुढारी वृत्तसेवा
बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने सहा अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी शिक्षक प्रमोद सरदार विरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बाळापूर तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक प्रमोद सरदार हा अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करीत होता. विद्यार्थीनींना जवळ बोलावणे, मोबाईलद्वारे अश्लील व्हीडिओ दाखविणे, असे अश्लील प्रकार शिक्षक शालेय विद्यार्थीनींसोबत करायचा. त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थीनीने पालकांना ही बाब सांगितली. या प्रकरणी उरळ पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षक प्रमोद सरदार विरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आह़े. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.