अकोला; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अकोला जिल्ह्यातील नांदखेड भंडारज फाट्याजवळ गुरूवारी (दि. १२) संध्याकाळच्या सुमारास घडली. मृत बिबट्या बराच वेळ रोडलगत पडून होता.
या परिसरात रस्ता ओलांडताना हरीण, नीलगाई व रानडुक्कर असे अनेक वन्यजीव अनेकदा दिसून येतात. या मार्गावर भरधाव वाहनांची वाहतूक सुरू असते. या मार्गावर बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आह़े. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग पातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जावून मृत बिबट्याला अकोला येथे पुढील कार्यवाही साठी पाठविण्यात आले.