अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोट तालुक्यातील वरूर शेतशिवारात युरिया मिश्रित पाणी पिल्याने चार जनावरांचा मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी (दि. २९) घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
वरूर जउळका येथील शेतकरी अक्षय पाचपोहे यांचे भाऊ यांनी गुरूवारी दुपारी नियमितपणे सहा जनावरांना पाणी पाजले. यानंतर ही जनावरे थरथर कापत होती. त्यामुळे त्यांनी लगेच वरूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. पशुवैद्यक यांनी उपचार केले. मात्र, सहापैकी चार जनावरांचा मृत्यू झाला.
या जनावरांना युरिया मिश्रित दूषित पाणी पाजले गेल्याने विषबाधा झाल्याचे वरूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांचे म्हणणे आह़े. या जनावरांमध्ये दोन बैल, एक कालवड एक गोऱ्हा यांचा समावेश आह़े.