नागपुरात भरधाव बसने घेतला पाच वर्षीय चिमुकल्याचा बळी | पुढारी

नागपुरात भरधाव बसने घेतला पाच वर्षीय चिमुकल्याचा बळी

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

एका भरधाव बसने पाच वर्षांच्या मुलाला चिरडल्याची घटना नागपुरात घडली आहे. या घटनेत मुलगा जागीच ठार झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी बसवर दगडफेक केली.

उमरेड रोडवरील पांडव कॉलेजसमोर एका खासगी बसने पाच वर्षीय मुलाला धडक दिली. बस भरधाव वेगात असल्याने ही धडक इतकी जबर होती की मुलगा जागीच गतप्राण झाला. शुभम साजन काकडे असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव असून तो पारशिवनी येथील रहिवासी आहे.

दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन संतप्त जमावाला शांत करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

हे ही वाचा : 

पहा व्हिडिओ : अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद |monkey dogs gangwar in beed

Back to top button