नागपुरातल्या ओमायक्रॅान बाधितानं घेतली नव्हती लस - पुढारी

नागपुरातल्या ओमायक्रॅान बाधितानं घेतली नव्हती लस

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा

नागपुरात सापडलेल्या ओमायक्रॅान बाधित रुग्णाने लस घेतली नसल्याचं समोर आलंय. पश्चिम आफ्रिकेतील बुर्कीना फासोतून ५ डिसेंबरला हा रुग्ण नागपुरात आला. नागपूर एम्सच्या विशेष खोलीत विदर्भातील पहिल्या ओमायक्रॅानबाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. ओमायक्रॅानबाधित रुग्णाला एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. कंपनीच्या कामानिमित्त त्यांना आफ्रिकेत जावे लागले. ओमायक्रॅानबाधिताच्या परिवारातील सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दिल्लीवरुन नागपुरात येताना विमानातील सहप्रवाशांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ८० च्या खाली आहे. गेल्या २४ तासांत चार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. ३९४७ जणांच्या कोरोना चाचण्यांमधून चारजण पॅाझिटिव्ह आले आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १२ कोरोना रुग्ण बरे झाले. ओमायक्रॅानचा रुग्ण आढळल्याने नागपूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.

नागपूरमध्ये ५ डिसेंबर रोजी पश्चिम आफ्रिकेहून आलेल्या एका रुग्णाचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल सकारात्मक आढळून आला. ५ डिसेंबर रोजी नागपुरात आलेल्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णाची रिपोर्ट जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुणे एनआईवीमध्ये पाठविण्यात आला होता. त्या अहवालातील एका रुग्णाला ओमायक्रॅान असल्याचे आढळून आले. या ४० वर्षीय ओमायक्रॅान बधितामध्ये कोणतेही लक्षणे नाहीत.

या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची सुद्धा तपासणी करण्यात आली. ओमायक्रॅानचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सर्व कोव्हिड नियमांचे पालन करावे, मास्क, शारीरिक अंतर आणि हात वेळोवेळी सॅनिटायजर करीत राहण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व नागपूरकरांना केले आहे. तसेच ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला आहे अशांनी त्वरित तपासणी करून घ्यावी. सोबतच अजूनही लस न घेतलेल्या व्यक्तींनी लस घेण्यासाठी पुढे यावे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे आणि ८४ दिवस झाले आहेत. त्यांनी लवकर दुसरा डोस घ्यावा, असे आवाहनही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

हे वाचा :

Back to top button