चंद्रपूर : ट्रकची ट्रॅक्टरला धडक; दोन ठार, एक गंभीर - पुढारी

चंद्रपूर : ट्रकची ट्रॅक्टरला धडक; दोन ठार, एक गंभीर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :वेकोली वणी परिसरातील घुग्घुस खदान संकुलात बांधण्यात आलेल्या नवीन बायपास रोडवर ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी (दि. 11) रोजी घडली. जखमीला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, ट्रक क्रमांक एमएच 34 एबी 9362 हा वणी वेकोली परिसरातील कोळसा खाणीतून कोळसा घेऊन जाण्यासाठी निघाला होता. तर एमएच 34 05080 हा ट्रॅक्टर याच मार्गाने जात असताना ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर चालक मनोज, हेल्पर रुपेश बारसागडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोळसा कंपनीने पन्नास लाख दिल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही

या अपघातात ट्रॅक्टरवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनास्थळी काँग्रेस नेते राजू रेड्डी, रोशन पचारे, पवन आगदारी, सैय्यद अनवर व भाजप नेते विवेक बोढे आले होते. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांची भरपाई दिल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला.

हेही वाचा

Back to top button