चंद्रपूर : २५ हजाराची लाच घेताना भद्रावतीच्या तहसीलदारांना अटक | पुढारी

चंद्रपूर : २५ हजाराची लाच घेताना भद्रावतीच्या तहसीलदारांना अटक

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा

पकडलेले रेतीचे वाहन सोडून देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच स्विकारताना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे तहसीलदार डॉ. नीलेश खटके यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आज शनिवारी (11 डिसेंबर) रोजी सकाळी साडेआकराच्या सुमारास तहसील कार्यालयात करण्यात आली.

यातील फिर्यादीने विटाभट्टीच्या कारखान्यासाठी मातीच्या लीजसाठी भद्रावतीच्या तहसीलदारांकडे रीतसर लेखी मागणी केली होती. या कामासाठी तहसिलदार डॉ. खटके यांनी फिर्यादीकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर 25 हजार रूपयांवर तोडपाणी झाले.

त्यानंतर फिर्यादीने याबाबतची तक्रार काल शुक्रवारी 10 डिसेंबरला नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याची शहनिशा करून एसीबीने आज शनिवारी (11 डिसेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास तहसील कार्यालयात सापळा रचला. आणि फिर्यादीकडून पंचवीस हजार रुपये स्वीकारताना तहसीलदार डॉ. खटके यांना रंगेहात अटक करण्यात आली.

तहसीलदार डॉ. खटके यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली. खटके यांची कारकीर्द वेगवेगळ्या प्रकरणाने वादग्रस्त ठरली आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगिता चापले, पोलीस हवालदार रविकांत डहाट, अनिल बहिरे, निशा उमरेडकर, पोलीस शिपाई अमोल मेंगरे यांनी केली.

हेही वाचा

Back to top button