चंद्रपूर महानगरपालिका : पाच महिन्यात ५ हजार ४४३ नवजात बालकांचा जन्म - पुढारी

चंद्रपूर महानगरपालिका : पाच महिन्यात ५ हजार ४४३ नवजात बालकांचा जन्म

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत मागील पाच महिन्यात ५ हजार ४४३ नवजात बालकांचा जन्म झाल्याचा अहवाल चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत आज (२९ सप्टेंबर २०२१) ला सादर करण्यात आला.

आज सोमवारी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत महिला व बालकल्याण समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती पुष्पा उराडे व उपसभापती शितल कुलमेथे यांच्यासह समिती सदस्यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या प्रत्येक सभेमध्ये स्त्रीभ्रूणहत्या तसेच मुला मुलींच्या जन्माचे गुणोत्तर प्रमाण किती आहे, याबाबत अहवाल सादर करण्यात येतो. यावेळी मे २०२१ ते सप्टेंबर २०२१ या पाच महिन्याची जन्माची आकडेवारी सादर करण्यात आली. यात एकूण २६६० मुली तर २७८३ मुले असे एकूण पाच हजार ४४३ नवजात बालकांचा जन्म झाला आहे. बैठकीला शहरातील तिन्ही झोनचे सहायक आयुक्त यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर

मुला- मुलींची जन्मसंख्या (मे २०२१ ते सप्टेंबर २०२१)

महिना   मुली   मुले   एकूण
मे         ४१४   ४५६  ८७०
जून      ४४८   ४६७  ९५१
जुलै     ४५९   ४५७   ९१६
ऑगस्ट ६११   ६६६   १२७७
सप्टेंबर  ६९२  ७३७   १४२९
२२६०  २७८३ ५५४३

(गुणोत्तर प्रमाण – सरासरी एक हजार मुलांमागे ८१२ मुली)

Back to top button