कन्हान नदीत बुडून तिघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह मिळाला, दोघांचा शोध सुरू | पुढारी

कन्हान नदीत बुडून तिघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह मिळाला, दोघांचा शोध सुरू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा:  मौदा तालुक्यातील कन्हान नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला. वढना गावाजवळील पात्रात १० तरुण पोहायला गेले असता या ३ तरुणांचा बुडून मृत्यू झाला. त्यातील एकाचा मृतदेह मिळाला तर दोघांचा शोध सुरू आहे. सायंकाळी घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वामी नारायण मंदिर ट्रस्टच्या वर्धमान नगर येथील शाळेतील शिक्षक व कर्मचारी मौदा तालुक्यातील वढना येथील स्वामींनारायण गोशाळेत पिकनिकसाठी आले होते. गोशाळेला कन्हान नदीच्या पात्रात १० तरुण मुले पोहण्याकरिता नदीत ५ वाजेच्या सुमारास पोहोचले. सर्व तरुण नदीत पोहण्याकरिता उतरले. यापैकी तीन तरुण खोल पाण्यात गेले व बुडाले.

प्रशांत राजाभाई पटेल (वय २३, नागपूर, मूळगाव तितलागड ओरिसा) याचा मृतदेह मिळाला व अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण (वय २१, नागपूर, मूळगाव गौजुल, गुजरात), हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया (वय २८, नागपूर, मूळगाव अहमदाबाद गुजरात) येथील राहणारे होते. उपविभागीय अधिकारी श्याम मदुनरकर, तहसीलदार मलिक वीरानी, उपविभागीय पोलिस मुख्तार बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. अंधार पडल्यामुळे थांबवण्यात आलेली शोधमोहीम उद्या रविवार, २८ रोजी सुरू करण्यात येईल. उद्या एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात येईल.

हेही वाचा : 

Back to top button