नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तारखेबाबत संभ्रम कायम | पुढारी

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तारखेबाबत संभ्रम कायम

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे होणारे प्रस्तावित हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कामांची लगभग, तयारी दिसून येते. मात्र यंदा विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने कोणतीही तयारी प्रशासनाच्या पातळीवर दिसून येत नाही. त्यातच विधिमंडळ सचिवालयाकरीता होणारी पदभरती ही पुढे ढकलण्यात आल्याने संभ्रम आणखीनच वाढला आहे.

विधीमंडळातील पदभरती पुढे ढकलली

महाराष्ट्र विधीमंडळाचे आगामी तृतीय (हिवाळी) अधिवेशन ७ डिसेंबर रोजी विधान भवन नागपूर येथे सुरु होणार होते. अधिवेशन कालावधीसाठी सविचालयात लिपीक-टंकलेखक व शिपाई, संदेशवाहक निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील पदे भरण्यासाठी उमेदवारांची आवश्यकता असल्यामुळे इच्छूक उमेदवारांची आवश्यतेनुसार २६ व २७ रोजी विधान भवन नागपूर येथे कक्ष क्र. १ मध्ये उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले होते; परंतु काही कारणास्तव मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतीचा सुधारीत कार्यक्रम लचकरच कळवला जाणार असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.गं. हरडे यांनी केले आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button