टिपेश्वर अभयारण्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार - पुढारी

टिपेश्वर अभयारण्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची दहशत कायम असून एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्यास ठार मारल्याची घटना काल बुधवारी मध्यरात्री एक वाजता उघडकीस आली.

गुलाब कवडु कुंचलवार ( ४५) रा वांजरी असे वाघाने शिकार केलेल्या गुराख्या नाव आहे. गुलाब कुंचलवार हा गावातील शेतकरी व इतर नागरिकांचे जनावर चरण्यास नेत होता. बुधवारी नेहमीप्रमाणे गुलाबने सकाळीच वांजरी शिवारातील उजाड जमिनींकडे जनावरांना चरण्यास नेले होते. तो नेहमी सायंकाळी ६ च्या दरम्यान जनावरे गावात परत आणत होता.

परंतु, बुधवारी तो उशीर झाला असतानासुद्धा जनावरांना घेवून आला नव्हता. वांजरी शिवारात दबा धरून असलेल्या वाघाने गुलाबवर हल्ला करून त्यास जंगलात फरकटत नेले होते. यावेळी गुलाबच्या किंचाळल्याच्या आवाजाने वांजरी शिवारातील काही शेतकरी , शेमजुरांचे त्याकडे लक्ष गेले. त्याच्या मदतीसाठी धाव घेतली असता वाघाने गुलाबला जंगलामध्ये दोन किमीच्या आत फरकटत नेले.

या घटनेची माहिती वनविभागास देण्यात आल्यानंतर वन विभागाचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी रात्री दरम्यान गुलाबची शोध मोहीम राबविली. यामध्ये गावकऱ्यांनीसुद्धा त्यांना सहकार्य केले. मध्यरात्री १ वाजता दरम्यान गुलाबचा मृतदेह वांजरी शिवारातील सुन्ना बिट मधील कक्ष क्रमांक ६१ मध्ये मिळून आला. गुलाबचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आल्याने गावकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :  

Back to top button