वर्धा : रेल्वे पोलिसांच्या कारवाईत १३० किलो गांजा जप्त - पुढारी

वर्धा : रेल्वे पोलिसांच्या कारवाईत १३० किलो गांजा जप्त

वर्धा : पुढारी वृत्तसेवा

रेल्वे गाडीने मादक पदार्थाची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून सापळा रचून रेल्वे पोलिसांनी १३० किलो गांजा जप्त केला. ही कारवाई २० ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

बल्लारशाह येथे ट्रेनमध्ये मादक पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून लोहमार्ग पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशावरुन सापळा रचून रेल्वे गाडीत तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वेगवेगळ्या कोचमधून ८ बॅगा मिळून आल्यात. त्यामध्ये १३० किलो ४६५ ग्राम गांजा (किंमत १३ लाख ८ हजार ५०) हस्तगत करण्यात आला.

ही कार्यवाही लोहमार्ग पोलिस अधीक्षक राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक दयानंद सरवदे, मंडलवार, हनवते, वासेकर, यावले, राजेश ठाकरे, लोणारे, किरण काळबांडे आदींनी केली.

Back to top button