यवतमाळ: पुढारी वृत्तसेवा : भरधाव ट्रेलरची धडक लागून दोन तरूण जागीच ठार झाले. राळेगाव शहरातील वर्धा बायपासवर ही दुर्दैवी घटना आज (दि.१३) दुपारी घडली. करण पंडित मेश्राम (वय १८), मनोज महादेव जुमनाके (वय २२, रा. निधा ता. राळेगाव) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, करण व मनोज हे दोघे मजूर होते. ट्रॅक्टरवरून ते दोघे कामावर जात असताना राळेगाव वर्धा बायपासवर ट्रॅक्टरची पंजी पडली. ती उचलण्यासाठी दोघेही खाली उतरले. त्याच वेळी भरधाव आलेल्या १६ चाकाच्या ट्रेलरने (एमएच-३२-क्यू-५९३२) या दोघांनाही चिरडले. या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा