चंद्रपूर : शेतकरी दाम्पत्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : शेतकरी दाम्पत्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

शेतातून घरी परत येत असताना बंडीला जुंपलेल्या बैलांना शेततळ्यावर पाणी पाजत असताना बंडीवर बसून असलेले शेतकरी पती-पत्नी या दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (दि. ४) दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील मांडवा येथे घडली. अनिल डाहुले (वय ४०), त्यांच्या पत्नी छाया अनिल डाहुले (३५, दोघेही रा. मांडवा) अशी मृतांची नावे आहेत.

आर्यन खान सोबत सेल्फी घेणारा मिस्ट्री मॅन एनसीबीचा अधिकारी?

सविस्तर माहिती अशी की, कोरपना तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी शेतकरी पती-पत्नी अनिल डाहुले व छाया अनिल डाहुले हे दोघेही बैलबंडी घेऊन सकाळी शेतावर काम करण्यासाठी गेले होते. शेतात काम केल्यानंतर दुपारच्या सुमारास ते घरी येण्यासाठी निघाले. परत येत असताना वाटेतच एक सार्वजनिक शेततळे आहे. बैलांना बराच वेळ होवून पाणी न पाजल्यामुळे अनिलने जुंपलेल्या बैलासह बंडी पाण्यात टाकली. शेततळ्यातील पाण्यात जाताच बैलांनी बंडीखोलगट भागात ओढत नेली. त्यामुळे बंडीवर बसलेले शेतकरी दाम्पत्य पाण्यात बुडाले. तर दोन्ही बैल बंडीवरून सुटून पाण्यातून पोहत बाहेर पडले. मात्र पाण्यातील बंडीवरच शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला.

Pandora Papers : सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह ३०० भारतीयांची विदेशात गुप्‍त गुंतवणूक

या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तेव्हा पर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची कोरपना पोलीसांना तात्काळ दिली. कोरपना पोलिसांनी शेतकरी दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. मृत शेतकरी दाम्पत्याला एक चौदा वर्षाचा मुलगा आहे.

अधिक वाचा :

Back to top button