चंद्रपूर : राप्ती सागर सुपरफास्ट ट्रेनच्या जनरल डब्यात आग

चंद्रपूर : राप्ती सागर सुपरफास्ट ट्रेनच्या जनरल डब्यात आग
Published on
Updated on

चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी रेल्वे स्थानकावर काल (दि.१६) दुपारच्या सुमारास थांबुन आसलेल्या राप्ती सागर सुपरफास्ट ट्रेनच्या जनरल डब्यात अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. भीतीमुळे प्रवाशांची ट्रेनमद्धे एकच तारांबळ उडाली. यावेळी माजरी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जनरल डब्यात तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

बुधवारी दुपारी माजरी रेल्वे स्थानकावर गोरखपूर कोचीवेली राप्ती सागर सुपरफास्ट क्रमांक १२५१२ या गाडी थांबलेली होती. यावेळी अचानक जनरल डब्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेची माहिती माजरी रेल्वे स्थानकावर देण्यात आली, जनरल डब्यातून धूर निघू लागताच प्रवाश्यामधे प्रचंड तारांबळ उडाली. घटनास्थळी लगेचच रेल्वेचे अधिकारीही पोहचले.

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ जनरल डब्यात पोहोचून आग विझवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळातच आग आटोक्यात आली. दरम्यान, ट्रेनच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनूसार शॉर्ट सर्किटमुळे डब्यात आग लागल्याचे सांगितले.

हे वचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news