चंद्रपूर : पाणी नसल्यामुळे मोती बिंदूची शस्त्रक्रिया तीन दिवस थांबली | पुढारी

चंद्रपूर : पाणी नसल्यामुळे मोती बिंदूची शस्त्रक्रिया तीन दिवस थांबली

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाण्यामुळे मोती बिंदूची पाहणी शस्त्रक्रिया तीन दिवस लांबणीवर गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकी आला. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर येथील शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयाला भेट दिली, यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे आमदार जोरगेवार चांगलेच संतापले. यापुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी रुग्णालय प्रशासनाला दिली आहे.

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात मोती बिंदूवरील शस्त्रक्रिया आयोजित करण्यात आली होती, मात्र पाणी उपलब्ध नसल्याने मोती बिंदुवरील शस्त्रक्रिया तीन दिवस लांबली असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या निदर्शनास आले.
आमदार जोरगेवार यांनी नागरिकांच्या विविध समस्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नुकतीच शासकिय रूग्णालयाचा पाहाणी दौरा केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. घडलेला हा प्रकार संतापजनक असुन, यापूढे असे प्रकार खपवून घेणार नाही अशा शब्दात त्यांनी रुग्णालय प्रशासनाला खडसावले. पाणी नव्हते तर ते रुग्णालय प्रशासनाने आमच्या लक्षात आणुन देणे अपेक्षित होते. मात्र रुग्णालयातील समस्या या रुग्णालय प्रशासनाकडून आमच्यापर्यंत कधीच पोहोचवल्‍या जात नाहीत. रुग्णांकडून येथील समस्यांची माहिती आमच्या पर्यंत येते.

यापूढे असे चालणार नाही. येथील अडचणी या रुग्णालय प्रशासनाने आमच्या पर्यंत पोहचवाव्यात. येथे पाण्याची समस्या होती. तर महानगरपालिकेकडून पाणी उपलब्ध का केले नाही, असा सवाल करुन यापुढे असा प्रकार घडला, तर रूग्णालय प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा त्‍यांनी दिला.

हेही वाचा : 

Back to top button