नागपूर: वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली; तलावात बुडून तरुणाचा मृत्यू | पुढारी

नागपूर: वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली; तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.३०) उघडकीस आली. सुमारे पंधरा-वीस मुले मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी या तलावाच्या काठावर रविवारी सायंकाळच्या सुमारास एकत्र आली होती. यापैकी एक जण पाय धुण्यासाठी पाण्यात उतरला असता खोल गाळात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा मृतदेह बोटच्या साह्याने पोलिसांनी बाहेर काढला. आशिष दिगंबर मरडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो खापरी पुनर्वसन कॉलनीत वास्तव्याला होता. ॲमेझॉन कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून आशिष कामाला आहे.

मोहगाव झिलपी तलावात याआधी अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून 26 जानेवारीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी धोकादायक असल्याचा फलक लावण्यात आल्यानंतरही युवक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि खोल पाण्यात उतरतात. यातून अशा घटना वारंवार घडत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ?

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत चुरस वाढली: दुपारपर्यंत ६१ टक्के मतदान

हिंगोली: शेतजमीन मोजण्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा भूमापक ‘एसीबी’च्या जाळ्यात

Graham Reid Resigns : टीम इंडियाच्या प्रशिक्षकांचा राजीनामा, हॉकी वर्ल्डकपमधील पराभवामुळे घेतला निर्णय

Back to top button