नागपूर : महागाई, डॉ आंबेडेकर स्मारक प्रश्नी नागपुरात काँग्रेस आक्रमक | पुढारी

नागपूर : महागाई, डॉ आंबेडेकर स्मारक प्रश्नी नागपुरात काँग्रेस आक्रमक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तोडण्याच्या विरोधात तसेच बेरोजगारी, वाढत्या महागाईच्या विरोधात आज (दि.२०) नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापासून मज्जाव करणाऱ्या पोलिसांशी काही काळ कार्यकर्त्यांची झटापट झाली. बॅरिकेड तोडून आत जाण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत असल्याने वातावरण तापले. अखेरीस निवडक कार्यकर्त्यांना पोलिसांनी आत सोडले. शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतर वातावरण शांत झाले.

नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सोशल मीडिया विभाग प्रमुख विशाल मुत्तेमवार, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. आंबेडकर स्मारकाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

विधिमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत होता. भाजपचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताची धोरणे राबवत असल्याचा बडेजाव करीत असली तरी, डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडरच्या किमती सतत वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. याकडे या निमित्ताने लक्ष देण्यात आले.

हेही वाचा;

 

Back to top button