भंडारा : सोरना येथील जि.प. शाळेच्या यशोगाथेवर ‘निपा’चा लघुपट : राज्यातील ४ शाळांची निवड | पुढारी

भंडारा : सोरना येथील जि.प. शाळेच्या यशोगाथेवर ‘निपा’चा लघुपट : राज्यातील ४ शाळांची निवड

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : मागील चार ते पाच वर्षांत शाळेत विविध उपक्रमांद्वारे, डिजिटल शिक्षणाद्वारे किंवा पालक सहभागातून शाळेत चांगले बदल घडवून आणले आहे. अशा शाळेची यशोगाथा चित्रीकरण ‘निपा’ या शासकीय संस्थेद्वारे जिल्हा परिषद शाळा सोरणा (ता. तुमसर, जि. भंडारा) येथे करण्यात आले. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेद्वारे महाराष्ट्रातील चार शाळांची निवड यासाठी करण्यात आली आहे. यात भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल सोरणा गावातील शाळेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मागील चार ते पाच शाश्वत बदल घडवून आणलेल्या महाराष्ट्रातील केवळ चार शाळांची निवड चित्रीकरणासाठी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाळवी (मु. वाळवी, पो. गट्टा. ता. एटापल्ली, जि. गडचिरोली), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरना (ता. तुमसर जि. भंडारा), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळकोठे (ता. पारोळा, जि. जळगाव), दे. भ. रत्नाप्पा कुंभार हायस्कूल, राजापूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) या शाळांचा समावेश आहे.

सोरना शाळेच्या यशोगाथेचे चित्रिकरण निपाच्या सदस्यांनी शाळेत प्रत्यक्ष जाऊन १२ जानेवारीला केले. यात शाळेतील उपक्रम, लोकसहभाग याबाबत निपा प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील शाळेतील प्रगतीची प्रशंसा संस्थेमार्फत केली गेली. यशोगाथा सादरीकरणाचे वेळी गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. शाळेतील उपक्रमशील शिक्षक कैलाश चव्हाण व मुख्याध्यापक सि. सि. मेश्राम यांनी यशोगाथेचे सादरीकरण केले.

हेही वाचा : 

Back to top button