बुलडाणा : राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात | पुढारी

बुलडाणा : राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा :  राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा 425 वा जन्मोत्सव सोहळा गुरुवारी जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिताश्री लखुजीराव जाधव यांच्या ऐतिहासिक राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळावर परंपरेप्रमाणे सूर्योदयसमयी सोहळ्याला सुरुवात झाली. आकर्षक विद्युत रोषणाईने राजवाडा परिसर उजळून निघाला होता. सकाळी जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

मंगलवाद्यांच्या गजरात सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर सुवासिनींनी जिजाऊ जन्माचे पाळणा गीतगायन व जिजाऊ वंदना गायिली. यावेळी लखुजीराव जाधव यांचे वंशज विजयसिंहराजे जाधव व छाया जाधव या दाम्पत्याच्या हस्ते व जाधव कुळातील देऊळगावराजा, अडगावराजा, किनगावराजा येथील वंशज शाखांतील परिवारांनी जिजाऊ पुतळ्याची विधिवत महापूजा केली.

Back to top button