नाशिक: पंकजा मुंडे पुस्तक लिहिणार; मुलाखतीत व्यक्त केला मनोदय | पुढारी

नाशिक: पंकजा मुंडे पुस्तक लिहिणार; मुलाखतीत व्यक्त केला मनोदय

नाशिक; पुढारी वृत्तसेवा:  ज्या गोष्टी सार्वजनिकरीत्या बोलता येत नाहीत, त्या लिहून ठेवते. माझ्या जीवनात आजवर आलेल्या अनुभवांवर आधारित पुस्तक लिहिणार आहे, असे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. राजकारणाची जबाबदारी आल्यानंतर अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. पदव्युत्तर पदवीसाठी मला परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा होती. मात्र, ती राहून गेली. पण आता ते सारे मिळवावे, असे वाटत असल्याची इच्छा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

वुई प्रोफेशनलतर्फे आयोजित विद्यार्थी परिषदेत विलास बडे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या. असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल या संघटनेतर्फे रविवारी (दि. ८) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात त्यांच्या हस्ते युवकांना राज्यस्तरीय वंजारी युवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात काही मिळवण्यासाठी कुणापुढेही झुकणार नाही. स्वाभिमानाने जगणे हे आमच्या रक्तात आहे.. राजकारणातही अनेक गोष्टी अजूनही करायच्या बाकी आहेत. त्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार आहे. ज्या गोष्टी सार्वजनिकरीत्या बोलता येत नाहीत, त्या लिहून ठेवते. त्यामुळे आजवर आलेल्या अनुभवांवर आधारित पुस्तक लिहिणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button