यवतमाळ : गर्भवती पत्नीला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करुन जाणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू | पुढारी

यवतमाळ : गर्भवती पत्नीला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करुन जाणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : गर्भवती पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती करून गावाकडे परत जात असलेल्या व्यक्तीला मिनीबसने धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. रविवारी रात्री उमरखेड तालुक्यातील कुपटी गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
अमोल पांडुरंग शिंदे ( वय २७ रा.अंबाळी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती करून अमोल दुचाकीने उमरखेडकडे जात होता. पोफाळी पोलीस स्टेशन अतर्गत येत असलेल्या कुपटी (दत्तखांडी) शिवारात उमरखेड येथून नागपुरला जाणाऱ्या मिनीबसने धडक दिली. जबरदस्त धडकेत अमोल जागीच ठार झाला. पुढील तपास पोफाळीचे ठाणेदार राजीव हाके यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार प्रकाश बोबले, राम गडदे करीत आहेत.
हेही वाचा

Back to top button