भंडारा : जमिनीच्या वादातून लहान भावाचा खून | पुढारी

भंडारा : जमिनीच्या वादातून लहान भावाचा खून

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला जागीच ठार केल्याची घटना समोर आली आहे. दोन भावांमधील वाद विकोपाला जाऊन भररस्त्यात राग अनावर झाल्याने मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केले. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील कोलारा झरप रस्त्यावर घडली.

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, प्रभाकर उदाराम भोयर (वय ५२, रा. कोलारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुरेश उदाराम भोयर (वय ५५, रा. कोलारा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पालांदूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी व मृतक हे सख्खे भाऊ असून वडिलोपार्जित ८ एकर शेती सामूहिक आहे. सामूहिक शेती प्रत्येकाच्या नावाने वेगवेगळी करण्याच्या अनुषंगाने त्यांच्यात वाद होता. गत दोन महिन्यापूर्वी सुद्धा याच विषयावर त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती.

घटनेच्या दिवशी मृतक तुर पिकावर औषध फवारणी करण्याकरिता जातो म्हणून घरी पत्नीला सांगितले. त्याच्या पाठोपाठ आरोपी  सुद्धा स्वत:च्या सायकलवर कुºहाड लटकवून शेताकडे गेले. रस्त्यात त्यांची आमोरासमोर भेट होऊन वाद विकोपाला गेला. या वादातच आरोपीने मृतकाच्या मानेवर व गळ्यावर वार करून जागीच ठार केले. कुºहाड लगतच्या ९० फूट अंतरावरील झुडपात फेकून पसार झाले. मृतक प्रभाकर रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. प्राथमिकक्षणी अपघात झाल्याचे वाटले. त्यामुळे काहींनी मृतकाच्या घरी अपघात झाल्याचे बातमी दिली. मृतकाची पत्नी व मुलगी घटनास्थळी येऊन बघितले असता मानेवर कुºहाडीचे घाव दिसले. त्यांनी लगेच खून झाला असल्याची शंका व्यक्त केली. घटनास्थळावर शेजारील गावातील बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.

घटनास्थळावर श्वानपथक बोलविण्यात आले. श्वानाला कुऱ्हाडीचा गंधाचा आधार घेऊन थेट आरोपीच्या घराशेजारी व घरात घुसला. त्यामुळे आरोपी घरातच मिळून आला. आरोपीने खुनाची कबुली दिली. अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे व दिघोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार यांनी तपासाकरिता सहकार्य केले.

घटनास्थळावर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोळस व गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकाºयांनी भेट दिली. तपास ठाणेदार वीरसेन चहांदे, ओमप्रकाश केवट नावेद पठाण,मंगेश खुळसाम, करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button