नागपूर : ६० लाखाचा गंडा घलणाऱ्या पती पत्नीला अटक | पुढारी

नागपूर : ६० लाखाचा गंडा घलणाऱ्या पती पत्नीला अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एका दाम्पत्याने नातेवाईकांसह गावातील नागरिकांची फसवणूक करत ६० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. पाचपावली पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या या बंटी बबली दाम्पत्याविरोधात गुंतवणूकदार संताप व्यक्त करत आहेत.
याबाबतच्या अधिक माहितीनुसार, सुफी फंड योजनेत पैसे गुंतविल्यास अधिक व्याजदराने परतावा मिळेल, या आमिषाला अनेक नागरिक बळी पडले. त्यांनी त्यात गुंतवणूकही केली. परंतु, त्यांना कुठलाही परतावा मिळाला नाही. शिवाय, दिलेले पैसेही गमवावे लागले. गुप्ता नावाच्या दाम्पत्यांनी ही फसवणूक केली. विशेष म्हणजे या दाम्पत्याने त्याच्या नातेवाईकांनाही सोडले नाही. यांनी ३४२ ग्राहकांनी एकूण ६० लाख ६७ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत एका आरोपीला अटक केली तर दुसर्‍याचा पोलीस शोध घेत आहेत.
याप्रकरणी फिर्यादी महेश लोटनप्रसाद गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्जाची चौकशी केल्यानंतर पाचपावली पोलिसांनी आरोपींविरुद्ध  गुन्हा दाखल करीत आरोपी जितेंद्रनाथ गुप्ता याला अटक केली आहे. जितेंद्रनाथ ऊर्फ जितू लल्लूराम गुप्ता (वय ४४), अंजना ऊर्फ अंजू जितेद्रनाथ गुप्ता (वय ३८) असे या आरोपी दाम्पत्याचे नाव असून, यातील जितेंद्रनाथ गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही  वाचा

Back to top button