भंडारा : ट्रॅक्टरखाली चिरडून मजुराचा मृत्यू | पुढारी

भंडारा : ट्रॅक्टरखाली चिरडून मजुराचा मृत्यू

भंडारा; पुढारी ऑनलाईन डेस्क : पवणी तालुक्यातील निरगुडी येथे भरधाव ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला. यात ट्रॅक्टरला जोडून असलेल्या धान मळणीच्या मशीन खाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला. महेश देशमुख (रा.आकोट) असे मृत मजूराचे नाव आहे. तर सुरज रामटेके हा मजूर जखमी झाला. ही घटना आज (दि.७) पहाटे ५ च्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, निरगुडी येथील राजू रामटेके आज सकाळी ट्रॅक्टर व धान मळणी मशीन घेवून जात होते. ट्रॅक्टरवर महेश आणि सुरज रामटेके हे दोन मजूर होते. ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने धान मळणी मशीन पलटी झाले. यामध्ये ट्रक्टरवर बसलेले महेश याचा मशीन खाली दबून मृत्यू झाला. तर सुरज रामटेके हा जखमी झाला. अपघातानंतर अड्याळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

Back to top button