समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्तेच | पुढारी

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्तेच

नागपूर : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वायफळ गावाजवळील नियोजित कार्यक्रम स्थळी भेट दिली. उद्या, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूर ते शिर्डीपर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने काही अपूर्ण कामे मार्गी लावून तसेच त्रुटी दूर करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांचे सकाळी 9.45 वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री झिरो माईल्स येथून प्रवासाला सुरुवात करतील. सायंकाळी पाच वाजता शिर्डी येथे पोहोचतील आणि शिर्डी विमानतळावरून मुख्यमंत्री नवी दिल्लीकडे प्रयाण करतील.

Back to top button