चंद्रपूर : बल्लारपूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतून ५ लाख जाहीर | पुढारी

चंद्रपूर : बल्लारपूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतून ५ लाख जाहीर

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर पादचारी लोखंडी पुलाचा काही भाग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एक शिक्षिका मरण पावली होती. मृत शिक्षिका निलिमा रंगारी यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच अन्य जखमींवर योग्य उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश दिले आहेत.

रविवारी (दि.२७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बल्लापूर येथील रेल्वेचा लोखंडी पुलाचा काही भाग पादचारी प्रवास करीत असताना कोसळला होता. यामध्ये 17 प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी निलीता रंगारी ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. काल रात्रीच उपचारादरम्यान अतिदक्षता विभागात त्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट दिली व सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली.

यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतकाच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रु. अर्थसहाय्य प्रदान करण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करून मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच अन्य जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button