चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेतील जखमी शिक्षिकेचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेतील जखमी शिक्षिकेचा मृत्यू

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी लोखंडी पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या एका शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नीलिमा रंगारी (वय ४८, रा. बल्लारपूर) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. आणखी एक महिला मृत्यूशी झूंज देत आहे. अन्य जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी (दि.२७) सायंकाळी पाच च्या सुमारास बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्र 1 व 2 वरील पादचारी लोखंडी पूलाचा काही भाग कोसळला. त्यामध्ये 13 व्यक्ती जखमी झाल्या. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 2 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. अति दक्षता विभागात गंभीर जखमी निलिमा रंगारी व रंजना खडतड (वय 55) यांच्यावर उपचार सुरू होते. त्यापैकी निलिमा रंगारी यांचा उपचारादरम्यान रात्रीच मृत्यू झाला.

दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात जावून भेट घेतली. सदर पादचारी पूल हा ४० वर्ष जुना होता. त्याची योग्य देखभाल केली नव्हती. सदर पुलाबाबत तक्रारी प्राप्त होऊनही त्याकडे दुर्लक्ष केले. ही मोठी चूक असून याची चौकशी करत दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी रेल्वे विभागाला केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button