नागपूर : योगगुरू रामदेव बाबा यांच्‍या विरोधात आंदोलन | पुढारी

नागपूर : योगगुरू रामदेव बाबा यांच्‍या विरोधात आंदोलन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महिलांविषयी आपत्तीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी योगगुरू रामदेव बाबा यांच्या विरोधात राज्यव्यापी सर्वपक्षीय संताप पहायला मिळत आहे. नागपुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसने व्हेरायटी चौकात शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, उपाध्यक्षा नूतन खेतकर यांच्या नेतृत्वाखली आंदोलन केले. या आंदोलनातून रामदेव बाबरांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

युवक काँग्रेसने महाल येथील पतंजली स्टोअर्ससमोर घोषणाबाजी केली. पोस्टरला काळे फासले. देशभरातील महिलांची जोपर्यंत जाहीरपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत पतंजलीची दुकाने उघडू दिली जाणार नाहीत, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.

शुक्रवारी पतंजली योगपीठाच्या वतीने आयोजित महिला योग संमेलनात रामदेव बाबा यांनी महिलांच्‍या कपड्यावरुन वादग्रस्‍त विधान केले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यासुद्धा उपस्थित होत्या. त्यामुळे या विरोधाला अधिकच धार चढली आहे. रामदेवबाबा यांच्या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटत आहेत.

हेही वाचा

Back to top button