नागपूर विभागात ३५० अन्न प्रक्रिया प्रकल्प मंजूर | पुढारी

नागपूर विभागात ३५० अन्न प्रक्रिया प्रकल्प मंजूर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. पोटभर अन्नाबरोबरच भरपूर पोषण मूल्य असणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांचीही मागणी वाढत आहे. यासाठीच स्थानिक, सेंद्रिय तसेच पारंपारिक उत्पादनांना वाव देण्यासाठी केंद्र पुरस्कृत ‘आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’ ही योजना कृषी विभागामार्फत संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी घटकांतर्गत मंजूर प्रकरणांमध्ये महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. ऑक्टोबर अखेरीस वैयक्तिक लाभार्थी घटकांतर्गत नागपूर विभागात 350 अन्न प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाले आहेत.

नव्याने स्थापित होणा-या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तर वृद्धीसाठी क्रेडिट लिंक बँक सबसिडी या योजनेतून दिली जात असून संबंधित जिल्ह्याच्या एक जिल्हा एक उत्पादनावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जात आहे.

Back to top button