मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मुंबईतील अरबी समुद्रात शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांसह करण्यात येणारे जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले. यासंदर्भात रवीकांत तुपकर यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन व कापसाला उचित भाव मिळावा यासह शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार २४ नोव्हेंबरला मुंबईतील गिरगाव चौपाटी जवळ मरीन ड्राईव्ह येथे अरबी समुद्रात शेतक-यांसह सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अनेक शेतक-यांसह ते मुंबईत पोहचले होते.

मात्र यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी तुपकर यांना चर्चेसाठी बोलावले व त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने तुपकर यांनी त्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित केले आहे.

या बैठकीस कृषीमंत्री अब्दूल सत्तार, सहकार मंत्री अतूल सावे उपस्थित होते.

अधिक वाचा :

Back to top button