चंद्रपूर : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या - पुढारी

चंद्रपूर : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथे ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १२) उघडकीस आली. विनोद दादाजी नन्नावरे (रा. मिंथूर) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील विनोद दादाजी नन्नावरे हा शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खर्रा खाण्याच्या निमित्ताने घरातून बाहेर पडला. मात्र तो घरी परतला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा शोध घेतला असता मिंथुर येथील स्मशानभूमीकडेजाणाऱ्या कच्च्या रोडलगत एका निंबाच्या झाडाला विनोदचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

याबाबत पोलिस स्टेशन नागभीड येथे माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतकाचे शव ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले. मृतक विनोद नन्नावरे याचे पश्चात कुटुंबात वडील, आई, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येमागील कारण कळले नाही. पुढील तपास ठाणेदार प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात पो. ह. वा. येरमे करीत आहेत.

Back to top button