गडचिरोली : रानटी हत्तीच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी; घर, शेतीचीही नासधूस | पुढारी

गडचिरोली : रानटी हत्तीच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी; घर, शेतीचीही नासधूस

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या पूर्वोत्तर भागात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी (ता.२०) रात्री लेकुरबोडी (ता. कोरची) येथील सनकुबाई नरोटी या ८० वर्षीय महिलेला हत्तींनी हल्ला करत गंभीर जखमी केले. शिवाय हत्तींनी काही घरे आणि धान्यपिकांचेही नुकसान केले.

विदर्भात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाचे वर्चस्व

मागील महिन्यापासून ओडिशा येथून आलेल्या रानटी हत्तींची धानोरा, कोरची, कुरखेडा आणि देसाईगंज तालुक्यांत धुमाकूळ घातला आहे. दरम्यान गुरुवारी या हत्तींनी लेकुरबोडी येथील सनकुबाई कोलुराम नरोटी या वृद्धेच्या घरातील धान्य विस्कटत, घराची पडझड केली.  असलेल्या सनुकबाई यांच्यावर हत्तींनी हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

यानंतर सनुकबाई यांना तातडीने कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओडिशामधून गडचिरोलीत आलेल्या हत्तींनी परिसरातील शेतामधील धान्यपिकांचे मोठे नुकसान केले आहे. या घटनेनंतर बेळगाव वन परिक्षेत्राचे अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनी घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह लेकुरबोडी गावावर कडी नजर ठेवली आहे.

Back to top button