Nitin Gadakari : विकासातील असमतोल दुर करण्याची गरज; नितीन गडकरी | पुढारी

Nitin Gadakari : विकासातील असमतोल दुर करण्याची गरज; नितीन गडकरी

नागपुर; पुढारी वृत्तसेवा : भारताच्या विकासात असमतोल आहे तो दूर झाला पाहिजे. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. गरीब – श्रीमंतीचं अंतर कमी झालं पाहिजे. समाजात सामाजिक विषमता आहे त्याचप्रमाणे आर्थिक विषमताही आहे. ती दूर करावी लागेल. ग्रामीण भागात विकास कमी आहे पण शहरात काही प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गावातील लोक नाईलाजाने शहरात येतात. त्यानंतर शहरात समस्या निर्माण होतात. त्यामुळं गावात विकास झाला पाहिजे. तिथे रोजगार निर्माण झाला पाहिजे. गावांना शक्तिशाली संपन्न बनवायचं आहे. या संपूर्ण ग्रामीण भारताच्या विकासासाठी आम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे. असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते भारत विकास परिषदच्या संमेलनात बोलत होते.

ते पुढे असेही म्हणाले की, १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यांनतर यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. त्यामुळे आम्ही सुराज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की, आम्हाला स्वराज्य मिळालं आता सुराज्य निर्माण करायचा आहे. आज आपल्या देशात उद्दिष्टांशिवाय कुठलंही काम होत नाही. आमचे उद्दिष्ट निश्चित आहे. आम्ही काम करत आहोत. मात्र अजूनही उद्दिष्टांपासून दूर आहोत. त्यासाठी वेग वाढवावा लागेल. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील ५ वी आहे. मी मंत्री होतो तेव्हा दुर्गम भागात अनेक रस्ते बनविले आहेत. तसेच मी संकल्प केला आहे की, या देशातून पेट्रोल, डिझेल संपवायचं आहे. यामुळे प्रदूषण होत आहे. मी इलेक्ट्रिक, इथेनॉलच्या वापरावर जोर देत आहे. यावर चालणारी वाहने बनत आहेत.

देशाला विश्वगुरू बनवायचं आहे. बायो फ्युलमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्माण होईल. भारताला आत्मनिर्भर बनवायचं असेल तर भारत बायोफ्युल एक्स्पोर्ट करणारा देश बनायला पाहिजे, असंही गडकरी म्हणाले.

दिव्यांगांना चष्मे वाटप करणे, साहित्य देणे हे काम आहे पण पर्याप्त नाही. देशाला विश्वगुरू बनवायचं आहे तर अधिक गतीने काम करावं लागेल. कमी वेळात जास्त काम कसं करता येईल, यावर विचार झाला पाहिजे. हवेत उडणारी बस आणण्याचा आम्ही विचार करतो आहोत. विकासासाठी फक्त मेहनत करून चालत नाही. त्यासाठी योग्य दृष्टी पाहिजे, असंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं.

भारत विकास परिषदेच्या नावातचं विकास आहे. मातृभूमी भय, भूक यापासून मुक्त असावी. जगातील विश्वगुरु बनायचं आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकास परिषद काम करते. स्वराज्य व सुराज्य यासाठी समाजात परिवर्तन आवश्यक आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वराज्य मिळालं आता सुराज्य मिळावा. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. येथील व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांनी गुलाम बनविलं. बलशाली राष्ट्र निर्माण करणे, हा उद्देश होता. उद्दिष्टाशिवाय काही कारण नाही. उद्दिष्ट निश्चित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचं आहे असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा

Back to top button