उद्धव ठाकरे यांच्या समक्ष शिवबंधन बांधणार : सुनील महाराज | पुढारी

उद्धव ठाकरे यांच्या समक्ष शिवबंधन बांधणार : सुनील महाराज

वाशीम, पुढारी वृत्तसेवा : बंजारा समाजाची काशी म्हणून परिचीत असलेल्या पोहरादेवी येथील महंत शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. दरम्यान, महंत सुनील महाराज यांनी पोहरादेवी येथून या चर्चेला दुजोरा दिला आहे. ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधणार आहेत. तसेच राज्यभरात सुनील महाराज यांना मानणारा वर्ग सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राठोड याच्यावर नाराज असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सुनील महाराज या वेळी म्हणाले आहेत. शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट महंतांना शिवबंधन बांधून आखाड्यात उतरवले आहे. मतदारांना शिवसेनेकडे वळती करण्यात त्याबरोबर राज्यात १ लोकसभा, ५ विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजातील उमेदवार देण्याच्या आश्वासनाने महंत सुनील महाराज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेऊन येत्या काही दिवसांतच शिवबंधन बांधणार आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button