भंडारा : गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह | पुढारी

भंडारा : गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा तालुक्यातील जाख गावाजवळ गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. कार्तिक सोमाजी मडावी (वय २१, रा. धारगाव) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबतची माहिती अशी की, वैनगंगा नदीवरील धरणाचे बॅकवॉटर भंडारा व पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या आजूबाजूच्या गावात पसरले आहे. या बॅकवॉटरमध्ये अनेक खून, आत्महत्या होण्याचे प्रकार वाढले आहेत. २३ सप्टेंबर रोजी शैलेश शेळके हे त्याच्या शेतावर गेले असता जाख गावाजवळील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. यानंतर शेळके यांनी याबाबतची माहिती जाखचे पोलिस पाटील सुभाष पडोळे आणि अड्याळ पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गावातील तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.

या तरुणाच्या खिशात सापडलेल्या आधारकार्ड वरुन त्याची ओळख पटली आहे. या घटनेची नोंद अड्याळ पोलिस ठाण्यात रात्री उशिराने करण्यात आली.

हेही वाचलंत का? 

Back to top button