लैंगिक अत्याचार पीडितेने दिला बाळाला जन्म; लग्नास नकार देणाऱ्या तरुणासह सहा जणांविरुध्द गुन्हा | पुढारी

लैंगिक अत्याचार पीडितेने दिला बाळाला जन्म; लग्नास नकार देणाऱ्या तरुणासह सहा जणांविरुध्द गुन्हा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : कायदेशीर लग्नाचे आमिष दाखवित लैंगिक अत्याचार केल्याने गर्भवती झालेल्या एक तरुणीने बाळाला जन्म दिला. मात्र, लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाने तरुणीला लग्नास नकार दिला. याबाबत पीडित महिलेने तक्रार गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी श्रेयस दादाराव धंदर (वय 23), दादाराव धंदर (वय 60), उपसरपंच रोषन रमेश बहिरमकर व तीन महिला (सर्व रा. नांदगाव खंडेश्वर) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, श्रेयस धंदर ऊर्फ शुभमने तरुणीला प्रेम असल्याचे विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तरुणीला नागपूरला नेऊन तेथील एका शिव मंदिरात लग्न केले. तेथून त्याने तरुणीला आपल्या घरी नेले. त्यावेळी श्रेयसच्या कुटुंबियांनीही तरुणीला सुन असल्याचे भासविले. त्यानंतर श्रेयसने तरुणीवर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. दरम्यान त्याने बहिणीच्या लग्नाचे कारण सांगून तरुणीला परत तिच्या घरी परत पाठविले. त्यानंतर कायदेशीर लग्न करण्याबाबत तरुणीने श्रेयसला म्हटले असता, त्याने तरुणीला गुजरातच्या बडोदा येथे नेले आणि तेथेही शारीरिक संबंध प्रस्थापीत करण्यास भाग पाडले.

पीडित तरुणी गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. परंतु सदर बाळाचा स्विकार करण्यास श्रेयससह त्याच्या कुटुंबियांनी नकार दिला. तसेच तरुणीला शिविगाळ करून धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button