अमरावती: दोन मुलींची फसवणूक करून केले लैंगिक अत्याचार | पुढारी

अमरावती: दोन मुलींची फसवणूक करून केले लैंगिक अत्याचार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण परिसरात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना 15 सप्टेंबर रोजी उघडकीस आल्या. मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चुलत भावाने चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केला, तर चिखलदरा ठाण्याच्या हद्दीत पतीपासून विभक्त राहणा-या एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.

चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार

भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना मोर्शी तालुक्यातील एका गावात 15 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. चुलत भावाने आपल्या चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची एक घटना मोर्शी तालुक्यात पुढे आली आहे. याप्रकरणात 17 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी चुलत भावाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे मोर्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

27 वर्षीय महिलेचे पतीविरुध्द न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण सुरु आहे. दरम्यान तिची ओळख एका व्यक्तीशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापीत झाले. त्यानंतर सदर व्यक्तीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, तिला एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. परंतू त्यानंतर त्याने महिलेला लग्नास नकार दिला. या घटनेची तक्रार 27 वर्षीय पिडित महिलेने 15 सप्टेंबर रोजी चिखलदरा पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सागर मनोहर निंभोरकर याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

Back to top button