नागपूर : खंडणीसाठी मैत्रिणीकडूनच ‘त्‍या’ मुख्याध्यापकाचे अपहरण; दोघांना अटक

नागपूर : खंडणीसाठी मैत्रिणीकडूनच ‘त्‍या’ मुख्याध्यापकाचे अपहरण; दोघांना अटक
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: नागपुरातून बेपत्ता झालेल्या मुख्याध्यापक प्रदीप मोतीरामानी यांचे अपहरण त्यांच्याच मैत्रिणीने खंडणीसाठी केल्याचे उघडकीस आले आहे. आपला घटस्फोटीत पती आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची माहिती आहे. जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली होती. पैसे न दिल्यास मृतदेहच पाठविण्याची धमकी आरोपींनी दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

प्रदीप मोतीरामानी (वय ४६, रा. क्रिष्णाती चौक, जरीपटका) हे नागपुरातील महात्मा गांधी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. शुक्रवार संध्याकाळी ते काही कामानिमित्ताने घराबाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. शुक्रवारी रात्री जेव्हा त्यांच्या मुलीने वडिलांच्या फोनवर संपर्क साधला. तेव्हा अपहरणकर्त्यांनी प्रदीप यांच्या सुटकेसाठी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर मोतीरामानी कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती.

शुक्रवार रात्रीपासून पोलीस पथक प्रदीप यांचे शोध घेत असताना शनिवारी संध्याकाळी ते सुखरूप घरी परतले. या प्रकरणी पोलिसांनी एक महिला व सूरज फलके (वय २० ) याव ताब्यात घेतले आहे. यातील विक्की जैस हा आरोपी अद्यापही फरार आहे. ताब्यात घेण्यात आलेली महिला आरोपी ही शिक्षिका म्हणून कार्यरत होती. दरम्यान, महिला संशयित आरोपी आणि प्रदीप यांच्यात 'खास' मैत्री झाली होती. त्यानंतर तिने तेथून नोकरी सोडली. दुसऱ्या शाळेत शिकविणे सुरु केले. तरीही संबंधित महिला आणि प्रदीपचे प्रेमसंबंध कायम होते.

महिला आरोपी आणि तिचा पती यांना एक मुलगी आहे. त्यांनी २००९ मध्ये घटस्फोट घेतला आहे. महिलेने आणि तिच्या घटस्फोट झालेल्या पतीने प्रदीपच्या अपहरणाचा बेत आखून शुक्रवारी रात्री १० वाजता त्याचे अपहरण केले. परंतु पोलिसांनी माहिती मिळाल्याने आरोपींनी शनिवारी सायंकाळी ७ वाजता प्रदीपला सोडून दिले. प्रदीपचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांची पत्नी ज्योती प्रदीप मोतीरामानी (वय ४६ ) यांनी जरीपटका ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवून काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले.

प्रदीपचे अपहरण करुन विक्की जैस याच्या कारमध्ये बसवून मानकापूरच्या महाराणा १ या अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावर फ्लॅटवर नेले. रात्रभर प्रदीपला आरोपींनी तेथेच ठेवले. तसेच मौदा येथे जाऊन प्रदीपच्या मोबाईलवरुन ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र, हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याने घाबरुन आरोपींनी मुख्याध्यापकाला सोडून दिले. प्रदीपच्या कुटुंबियांकडून १५ लाख रुपये मिळतील, अशी आरोपींना अपेक्षा होती. दरम्यान, आरोपींकडे बंदूक आणि चार राउंड सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news