अकोला : भावना गवळींच्या मेळाव्याला जाणे गैर नाही : प्रवीण दरेकर | पुढारी

अकोला : भावना गवळींच्या मेळाव्याला जाणे गैर नाही : प्रवीण दरेकर

अकोला; पुढारी वृत्तसेवा न्यायालयाने खासदार भावना गवळी यांना दिलासा  दिला आहे. त्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या मेळाव्याला जाणे काही गैर नाही, अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी मांडली. ते भावना गवळी यांच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आले असता  माध्यमांशी बाेलत हाेते.

शिंदे गट आणि भाजपचे मेळावे सुरूच राहतील, असेही दरेकर या वेळी म्‍हणाले.  किरीट सोमय्या वाशीम दौऱ्यावर असताना भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करत शाईसुद्धा फेकली होती. त्या संदर्भात न बोलता प्रवीण दरेकरांनी काढता पाय घेतला.  शिवसेना – भाजपची जुनीच मैत्री आहे. नवीन नाही. लोकाना अभिप्रेत अशीच मैत्री आहे अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. वाशीम येथे जाण्यासाठी अकोला येथे आले असताना ते बोलत होते.

हेही वाचा :  

Back to top button