बुलढाणा : प्रेतयात्रा थांबवून गायले राष्ट्रगीत; शोकाकूल वातावरणात राष्ट्रभक्तीची प्रचिती | पुढारी

बुलढाणा : प्रेतयात्रा थांबवून गायले राष्ट्रगीत; शोकाकूल वातावरणात राष्ट्रभक्तीची प्रचिती

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : स्मशानाकडे निघालेली प्रेतयात्रा थांबवून आप्तेष्ट व ग्रामस्थांनी सामूहिक राष्ट्रगीत गायले. बुधवारी सकाळी 11 वाजता एका वृद्ध महिलेच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी गावातून ही अंत्ययात्रा चालली होती. जळगाव जामोद तालुक्यातील काजेगाव येथे शोकाकूल वातावरण बाजूला सारत राष्ट्रभक्तीची प्रचिती दिसून आली.

काजेगाव येथील सुमनबाई बोरनारे (84) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी 17 ऑगस्टच्या सकाळी 11 वाजता जेथे असाल तेथेच उभे राहून राष्ट्रगीत गायनाचे आवाहन प्रशासनाकडून केलेले होते. दरम्यान, घरापासून निघालेली सुमनबाईंची अंत्ययात्रा ही गावच्या ग्रामपंचायत समोरून जात होती. दरम्यान प्रशासनाच्या आवाहनानूसार राष्ट्रगीताची नियोजित वेळ झाली होती. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी असलेल्या आप्तेष्ट व ग्रामस्थांनी वाटेत तिरडी खाली ठेवली व सामूहिक राष्ट्रगीत गायले.

हेही वाचा

Back to top button