Tiger : वाघाच्या अवयवाची तस्करी; ४ जणांना अटक  | पुढारी

Tiger : वाघाच्या अवयवाची तस्करी; ४ जणांना अटक 

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील बुटिबोरी वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या चमूने वाघाच्या (Tiger) दातासह चार आरोपींना अटक केली आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.

चंद्रपूर महामार्गावरील अपना पंजाब ढाबा येथे वनविभागाने सापळा रचला होता. यावेळी आरोपींकडून ‌वाघाच्या (Tiger) दातांसह दुचाकीदेखील जप्त करण्यात आली. नागपूर ग्रामीण न्यायदंडाधिकारी यांनी चारही आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत वनकोठडी ठोठावली आहे.

या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे साहाय्यक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार यांनी सांगितले. ‌उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. ठोकळ, वनपाल केकान, एस. व्ही. नागरगोजे तसेच वनकर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार करीत आहेत.

Back to top button