चंद्रपूर : वाघाच्‍या हल्‍ल्‍यात गुराखी ठार | पुढारी

चंद्रपूर : वाघाच्‍या हल्‍ल्‍यात गुराखी ठार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : गावाशेजारील जंगलात बैल चारायला घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये गुराखी जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी (दि.13) सायंकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा जंगलात घडली. काल हा गुराखी घरी न परतल्याने शोधाशोध केल्यानंतर रविवारी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. रामदास नैताम (वय 66 रा. चिकमारा, ता. सिदेवाही  ) असे मृताचे नाव आहे.

रामदास  हे नेहमीप्रमाणे  शनिवारी गावाशेजारील जंगलात बैल चारायला घेऊन गेले होते. दिवसभर चारल्यानंतर सायंकाळी वाघाने त्‍यांच्‍यावर हल्ला केला. त्‍यांना ओढत जंगलाच  नेले. सायंकाळ होवूनही तो घरी न परतल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली. या जंगल परिसरात वाघ वास्तव्यास आहे. शिवाय त्याचे अनेकदा नागरिकांना दर्शनही झाले आहे. त्यामुळे त्‍यांचा वाघाच्या हल्यात मृत्य झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होता.

शनिवारी शोधाशोध केल्यानंतरही त्याघा मृतदेह मिळाला नाही. या घटनेची माहिती वनविभागाला माहिती देण्यात आली. रविवारी सकाळ पासून वनविभागाच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली असता मृतदेह आढळला. या घटनेने चिकमारा परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या जंगल परिसरात असलेल्या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी, नागरिकांमधून केली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button