चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार, एकजण जखमी

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार, एकजण जखमी
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात झाला. यामध्ये बोलेरोची ट्रकला जोराची धडक होऊन बोलेरोमधील ४ जण जागीच ठार झाले असून, एक जण जखमी आहे. येथील किसाननगरजवळ गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकला बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात रात्रीच्या सुमारास घडला.

गडचिरोली येथील पंकज बागडे हे (ता.सावली) त्यांचे मित्र अनुप ताडूलवार (रा.विहीरगाव) याच्यासोबत चंद्रपूर येथे डिजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बोलेरो (वाहन क्र.एम एच 33 ए 5157) ने गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत मित्र अनुप यांच्या पत्नीही होत्या. चंद्रपूर येथून साहीत्य खरेदी करून गावाकडे परत येत असताना, चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली तालुक्यातील किसानगर येथे हा भीषण अपघात झाला.

मुख्यमार्गावर गाय बसलेली असताना, तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे स्टेरिंगवरचे नियंत्रण सुटले आणि महामार्गावरील उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन बोलेरो वाहनाची जबर धडक बसली. या भीषण अपघातात बोलेरोमधील चारजण जागीच ठार झाले. या भीषण अपघातात पंकज किशोर बागडे ( वय २६, रा. गडचिरोली), अनुप रमेश ताडूलवार (वय ३५, रा. विहिरगाव ता. सावली), महेश्वरी अनुप ताडूलवार (वय २४, रा. विहीरगाव), मनोज अजय तीर्थगिरीवार (वय २९, रा. ताडगाव, ता. भामरागड) यांचा जागीच मृत्यू झाला. सुरेंद्र हरेंद्र मसराम (वय २३, रा.चिखली, जि. चंद्रपूर) हे जखमी आहेत.

हा अपघात एवढा भीषण होता की, बोलेरोची ट्रकला जोराची धडक झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे किसाननगर व व्याहाड खूर्द येथील नागरिक या ठिकाणी धावून आले. त्यानंतर सावली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून स्थानिकांच्या मदतीने अपघातातील मृतांना व जखमीला बाहेर काढले. मृतक व जखमीला सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news