अमरावती एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग | पुढारी

अमरावती एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : अमरावतीच्या जुन्या बायपासलगतच्या एमआयडीसीत (Amravati Midc) शनिवारी मध्यरात्री २ वाजता केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी सकाळी ९ वाजतापर्यंत अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

आगीचा धूर २ किलोमीटर अंतरावरून दिसून येत होता. आकाशात सर्वत्र काळा धूर पसरला होता.

आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमन विभागाने आठ बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

अमरावती शहरासहीत (Amravati Midc) बडनेरा, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, धामणगाव येथील अग्निशमन दलाच्या साह्यानाले हि आग आटोक्यात आणण्यात आली.

अद्याप हि आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नसले तरीही शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आगीत किती लाखांचे नुकसान झाले, याचे ऑडिट अग्निशमन विभाग करीत असल्याची माहिती आहे.

सदर कंपनीचे फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, तहसीलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

महापालिकेचे ६ व इतर शहरातील ५ असे एकूण ११ अग्निशमन वाहने व दलांकडून आग विझवण्यासाठी तातडीने पोहोचून प्रयत्न करण्यात येत आहेत.

आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.

Back to top button