अमरावती : बेंबळा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर वाहून 3 व्यक्ती बेपत्ता | पुढारी

अमरावती : बेंबळा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर वाहून 3 व्यक्ती बेपत्ता

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : बेंबळा नदीच्या पुलावरून पाच युवक ट्रॅक्टरसह सांयकाळी 7 च्या दरम्यान वाहून गेल्याची घटना घडली. नांदगाव खंडेश्वर येथून जवळच असलेल्या जावरा मोळवण येथील या नदीच्या पुलावरून वाहून गेलेल्या पैकी 3 युवक बेपत्ता असून 2 युवक सापडले आहेत.
आमदार प्रतापदादा अडसड यांनी या घटनेची दखल घेतल्याने ताबडतोब प्रशासनाला धाव घ्यावी लागली. त्यामध्ये अक्षय रामटेके, नारायण परतीके यांना नदीबाहेर काढण्यात यश आले आहे. सुरेंद्र डोंगरे, शेषराव चावके, मारुती चावके यांचासाठी शोध मोहीम सुरू आहे. प्रशासनाकडून पुर्ण प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती तहसीलदार पुरुषोत्तमजी भुसारी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
हेही वाचा

Back to top button